⚡देवगड ता.१३-:
शेठ म.ग. हायस्कूल, देवगडच्या “संगीतायतन ” विभागा तर्फे शुक्रवार दि. १४ फेब्रुवारी २०२५ रोजी सायं ५ वाजता शाळेच्या गुरुदक्षिणा सभागृहात गुरुवर्य डॉ. प्रिं. शंकर अनंत टेंकशे सरांच्या जन्मस्मृति दिनानिमित्त ” मर्म बांधतली ठेव ही ” या नाट्यगीत गायनाच्या मैफिलीचे आयोजन करण्यात आले आहे.गायक श्री. स्वप्नील गोरे (सावंतवाडी ) सौ. राधा जोशी ( देवगड )साथसंगत – प्रसाद शेवडे,(ऑर्गन), प्रसाद मेस्त्री (तबला ), उमेश कोयंडे ( तबला )
तर कार्यक्रमाचे निवेदन श्री. संजय कात्रे करणार आहेत. तरी या कार्यक्रमाला संगीतप्रेमी रसिकानी उपस्थित रहावे असे आयोजकांच्या वतीने कळविण्यात आले आहे.
देवगड हायस्कूल येथे 14 फेब्रुवारी रोजी मर्मबंधातली ठेव नाट्यगीत गायन मैफल…
