⚡बांदा ता.१२-: येथील शिक्षण प्रसारक मंडळ बांदा संचलित गोगटे– वाळके महाविद्यालय बांदाचा शैक्षणिक वर्ष २०२४–२०२५ वर्षाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ शुक्रवार दि. १४ फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजता महाविद्यालयातील सांस्कृतिक सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून साहित्यिक, कवी मनोहर परब हे उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण प्रसारक मंडळाचे चेअरमन मा. श्री. डी. बी.वारंग हे उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जी. जी. काजरेकर यांनी दिली.
वर्षभरात शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा व सामाजिक क्षेत्रात उल्लेनीय कार्य करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव मान्यवरांच्या हस्ते केला जाणार आहे . यावेळी या कार्यक्रमाला शिक्षण प्रसारक मंडळ बांदाचे उपाध्यक्ष मा. प्रमोद कामत , सचिव एस. आर. सावंत व संस्था पदाधिकारी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. दुपारी २ वाजता विद्यार्थ्यांचा विविध गुणदर्शनपर सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. तरी या कार्यक्रमाला उपस्थित राहून विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करावे असे आवाहन प्राचार्य डॉ.जी. जी .काजरेकर यांनी केले आहे
