सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत कसबा वाघोटण शाळा समूहनृत्य स्पर्धेत विजेता…

⚡देवगड ता.१३-: जिल्हा परिषद शिक्षण विभाग(प्राथमिक)
सिंधुदुर्ग मार्फत दिनांक ११ फेब्रुवारी ते १३ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत जिल्हास्तरीय ‘बाल कला, क्रीडा व ज्ञानी मी होणार महोत्सव’ आयोजित करण्यात आला आहे.
या महोत्सवामधील पहिल्या दिवशी मोठा गट व लहान गटाच्या समूहनृत्य स्पर्धा जिल्हा परिषद शाळा ओरोसच्या रंगमंच्यावर पार पडली. या स्पर्धेत मोठा गट समूहनृत्य प्रकारात ‘शाळा कसबा वाघोटण, ता. देवगड’ ही शाळा विजेती ठरली आहे.
या स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आठ तालुक्यांचे आठ संघ सहभागी झाले होते, त्यामधून देवगड तालुक्यातील ‘शाळा कसबा वाघोटण, ता. देवगड’ ही शाळा प्रथम क्रमांकाने विजेती ठरली आहे.सदर स्पर्धेचे बक्षीस वितरण श्री.गणपती कमळकर शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांच्या हस्ते करण्यात आले.
कसबा वाघोटण शाळेचा समूहनृत्याचा विषय – ‘शेतकरी सबलीकरण’ हा होता व या नृत्यामध्ये धनश्री जोशी, साक्षी गोठणकर, रिया परब, सानवी गुरव, विधी तेली, लावण्या घाडी, स्वरा गुरव, ओवी पुजारे, पूर्वी कोळसूमकर, सावली परब, देवराज तिर्लोटकर,प्रतिक टुकरूल हे विद्यार्थी सहभागी झाले होते.
विजेत्या विद्यार्थ्यांचे वाघोटण गावामध्ये संध्याकाळी ७:३० वाजता जंगी स्वागत व जल्लोष करण्यात आला.देवगड तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी श्री.श्रीरंग काळे, पडेल केंद्राचे केंद्रप्रमुख श्री. अशोक जाधव , सरपंच, उपसरपंच, ग्रामस्थ व शाळा व्यवस्थापन समिती यांनीही मुलांचे कौतुक आणि अभिनंदन केले.
या नृत्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री. उत्तम मोहिते, पदवीधर शिक्षक श्री. महेश राठोड, श्री. विवेक मगर उपशिक्षक श्री. शुभम चव्हाण, श्रीम. प्राजक्ता शिंदे, स्वयंसेवक श्रीम. प्रतीक्षा तिर्लोटकर, श्रीम. माधुरी मळईकर आणि सौ. चंद्रकला तेली मॅडम यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले.

You cannot copy content of this page