जेवण दिले नाही म्हणून काही तरुणांच्या जमावाने ढाब्यावरील कामगाराला केली मारहाण…

मालवण तालुक्यातील घटना:सहा संशयित व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल..

⚡मालवण ता.११-: मालवण तालुक्यातील एक ढाब्यावर रात्रीच्या वेळी जेवण दिले नाही म्हणून काही तरुणांच्या जमावाने हॉटेलच्या कामगारांना गंभीर मारहाण करून सोन्याच्या दागिन्यांची चोरी केल्याची तसेच हॉटेलच्या साहित्याची तोडफोड केल्याची घटना काल रात्री पावणे एक वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी प्राप्त तक्रारीनुसार मालवण पोलिसांनी सहा व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.दरम्यान यातील एका संशयितास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

You cannot copy content of this page