वराडकर हायस्कुल मध्ये आयोजित पाककृती स्पर्धेत सौ. प्रगती राणे प्रथम…!

⚡मालवण ता.११-: प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, कट्टा येथे आयोजित पाककृती स्पर्धेत सौ. प्रगती राणे यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. तर द्वितीय क्रमांक सौ.प्राची मराठे व तृतीय क्रमांक श्रीमती अमिता मालवदे यांनी मिळविला.

फोर्टी फाईड तांदूळ व तृणधान्य यांचे आहारातील महत्त्व व त्यातून मिळणारी पोषकतत्वे विद्यार्थ्यांना समजावी यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत फोर्टी फाईव्ह तांदूळ व तृणधान्य यापासून नाचणीचा केक, वडी, मोदक थालीपीठ लाडू असे विविध पौष्टिक व चविष्ट पदार्थ सहभागी स्पर्धकांनी बनवले. या स्पर्धेत विद्यार्थ्यांचे पालक, ग्रामस्थ, स्वयंपाकी सहभागी झाले होते. यावेळी तांदूळ व विविध कडधान्य यापासून इयत्ता सहावीच्या विद्यार्थिनींनी बनवलेली रांगोळी लक्षवेधी ठरली.

या स्पर्धेचे परीक्षण कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसार मंडळाच्या संचालिका सौ. स्वाती वराडकर व सौ.वैष्णवी लाड यांनी केले. यावेळी कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या सचिव विजयश्री देसाई, शालेय समिती अध्यक्ष सुधीर वराडकर, केंद्रप्रमुख श्रीकृष्ण सावंत, वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कट्टाच्या मुख्याध्यापिका सौ देवयानी गावडे, पर्यवेक्षक श्री. महेश भाट, सर्व शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन कलाशिक्षक समीर चांदरकर यांनी केले.

You cannot copy content of this page