⚡बांदा ता.११-: महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाने बांदा बसस्थानक परिसरात गैरव्यवहार करून आपल्या जागेवर अतिक्रमण केले असून महामंडळाने आपल्या जागेची हद्द निश्चित करावी यासाठी येथील सामाजिक कार्यकर्ते शामसुंदर धुरी यांनी शनिवार दिनांक १५ रोजी बांदा बसस्थानकच्या कार्यालयात बसून उपोषण करण्याचा लेखी इशारा दिला आहे. याबाबत त्यांनी एसटी महामंडळ व पोलीस ठाणे यांना निवेदन दिले आहे.
निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, सर्व्हे क्रमांक ३३/११ ही जागा महामार्गालगत असून बांदा बसस्थानकाला लागून आहे. ही जागा आपले काका सूर्यकांत धुरी यांच्या मालकीची आहे. मालकीची काही जागा एसटी महामंडळाच्या जागेत आहे. याबाबत वेळोवेळी हद्द ठरविण्याबाबत पत्रव्यवहार करण्यात आला आहे, मात्र याबाबत ठोस कार्यवाही करण्यात आली नाही. त्यामुळे एसटी महामंडळाने आपली हद्द ठरविण्यासाठी त्यांचे लक्ष वेधावे यासाठी आपण उपोषणाचा निर्णय घेतला आहे. एसटी बसस्थानकाच्या कार्यालयात बसून आपण उपोषण करणार असल्याचे त्यांनी निवेदनात शेवटी म्हटले आहे.
शामसुंदर धुरी यांच १५ रोजी बांदा बसस्थानकच्या कार्यालयात उपोषण…!
