शिवराजेश्वर मंदिराला मिळतो फक्त सहा हजाराचा निधी…

अधीकारी आणि प्रशासनाची अक्ष्यम्य उदासीनता:महाराष्ट्र मंदिर महासंघाची भरघोस निधीची मागणी..

कुडाळ : छत्रपती शिवाजी महाराजांचे सिंधुदुर्ग किल्ल्यावर असेलल्या एकमेव शिवराजेश्वर मंदिरासाठी वर्षाला फक्त ६ हजार रुपये निधी सरकारकडून दिला जातो. तो निधी भरघोस स्वरूपात मिळावा अशी मागणी महाराष्ट्र मंदिर महासंघ, हिंदू जण जागृती समिती यांच्या वतीने करण्यात आली आहे, असे मंदिर महासंघाचे राष्ट्रीय संघटक सुनील घनवट सांगितले. ते आज कुडाळ येथे माध्यमांशी बोलत होते.
सुनील घनवट म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचे सिंधुदुर्ग किल्ल्यावर शिव राजेश्वर मंदिर आहे. या मंदिरासंदर्भात हिंदू जण जागृती समिती केली दोन वर्ष सतत पाठपुरावा करत आहे. तत्कालीन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याना आम्ही या संदर्भातली माहिती दिली होती. माहितीच्या अधिकारात जी माहिती मिळाली. त्याप्रमाणे १९७० पासून या मंदिरासाठी मासिक अडीचशे रुपये एवढीच सरकार कडून मदत मिळते. १९९० मध्ये त्यात वाढ करून ती सहा हजार रुपये वार्षिक अशी करण्यात आली.
म्हणून आम्ही मागणी केली की छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर आहे. महिना अडीचशे रुपये म्हटले तर हारासाठी सुद्धा पुरत नाहीत, त्याच्यामध्ये या मंदिराचे देवस्थानाचं संवर्धन किंवा त्या ठिकाणची व्यवस्था पाहण्यासाठी या मंदिराला मदत करावी अशी मागणी केली. त्यांनतर तत्काळ तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी लगेच हे चालू करावे असे आदेश दिले होते. परंतु दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की अधिकाऱ्यांच्या प्रशासनाच्या उदासीन मानसिकतेमुळे आजही छत्रपती शिवाजी महाराजांचे सिंधुदुर्ग जिल्ह्यात किल्ल्यावरच्या मंदिराला दर महिन्याला पुरेसा निधी उपलब्ध नाही. त्यामुळे महाराष्ट्र मंदिर महासंघ, हिंदू जनजागृती समितीने सर्व मंदिरांच्या वतीने आणि हिंदुत्ववाडी संघटनाच्या वतीने आम्ही मागणी करतो, कि छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराला भरपूर निधी देण्यात यावा आणि या मंदिरासाठी जी काही संवर्धन असेल बाकी सगळ्या गोष्टी असेल या ठिकाणी सुरू करण्यात याव्यात. अशी मागणी सुनील घनवट यांनी केली आहे.

You cannot copy content of this page