माणगाव येथे ८ फेब्रुवारीला ‘मंदिर न्यास अधिवेशन’…

मंदिर संस्कृतीचे रक्षण आणि संघटना हा मुख्य उद्देश:भूमी बळकावणे, वक्फ बोर्ड अतिक्रमण, वस्त्रसंहिता यावर होणार सखोल चर्चा..

कुडाळ : मंदिर व्यवस्थापन सुधारण्यासाठी मंदिर विश्वस्त, पुजारी, भक्त आणि अभ्यासकांचे संघटन आवश्यक आहे. याच उद्देशाने हिंदु जनजागृती समिती, श्री दत्त मंदिर न्यास, माणगाव आणि महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या संयुक्त विद्यमाने ‘द्वितीय महाराष्ट्र मंदिर न्यास परिषद सिंधुदुर्ग जिल्हा’चे आयोजन ८ फेब्रुवारी रोजी श्री दत्त मंदिर, माणगाव येथे करण्यात आले आहे. या परिषदेत संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ५०० हून अधिक निमंत्रित मंदिर विश्वस्त, पुजारी, पुरोहित, अधिवक्ते आणि अभ्यासक सहभागी होणार आहेत. सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे हे देखील या परिषदेतील उपस्थित राहणार आहेत. मंदिर महासंघाचे राष्ट्रीय संघटक सुनील घनवट यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
यावेळी सुनील घनवट म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता अहिल्याबाई होळकर यांनी मंदिरांचे संरक्षण आणि जीर्णोद्धार केला; मात्र आज मंदिरांचे सरकारीकरण, मंदिरांच्या जमिर्नीवर अतिक्रमण, तसेच वक्फ बोर्डाद्वारे हिंदू मंदिरांच्या भूमी बळकावली जात आहे. यामुळे मंदिर संस्कृती आणि श्रद्धेवर परिणाम होत आहे. मंदिर व्यवस्थापन सुधारण्यासाठी मंदिर विश्वस्त, पुजारी, भक्त आणि अभ्यासकांचे संघटन आवश्यक आहे. याच उद्देशाने हिंदु जनजागृती समिती, श्री दत्त मंदिर न्यास, माणगाव आणि महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या संयुक्त विद्यमाने ‘द्वितीय महाराष्ट्र मंदिर न्यास परिषद सिंधुदुर्ग जिल्हा’चे आयोजन ८ फेब्रुवारी रोजी श्री दत्त मंदिर, माणगाव येथे करण्यात आले आहे. पालकमंत्री नितेश राणे हे देखील या परिषदेला उपस्थित राहणार आहेत. या परिषदेत संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ५०० हून अधिक निमंत्रित मंदिर विश्वस्त, पुजारी, पुरोहित, अधिवक्ते आणि अभ्यासक सहभागी होणार आहेत.
या परिषदेत मंदिरांच्या जमिनींवरील अतिक्रमणांविरोधात लढणारे अमरावतीचे अनुप जयस्वाल, धर्मादाय आयुक्त कार्यालयातील प्रक्रियांचे अभ्यासक साताऱ्याचे अधिवक्ता जनार्दन करपे, सनातनचे संत सद्‌गुरु कु. स्वातीताई खाडये, सद्‌गुरु सत्यवान कदम, तसेच महाराष्ट्र मंदिर महासंघाचे राष्ट्रीय संघटक . सुनील घनवट आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध मंदिर विश्वस्त, पुजारी आणि अधिवक्ते उपस्थित राहणार आहेत.
या परिषदेत ‘मंदिरे सनातन धर्मप्रचाराची केंद्रे बनवणे’, ‘मंदिरांचे पावित्र्य राखणे’, ‘मंदिरे सरकारीकरण मुक्त करणे’, ‘वक्फ कायद्याद्वारे मंदिरांच्या जमिनींवर होणाऱ्या अतिक्रमणावर उपाय’, ‘मंदिरे आणि तीर्थक्षेत्रांमध्ये मद्य-मांस बंदी’, तसेच दुर्लक्षित मंदिरांचा जीर्णोद्धार यांसारख्या महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चासत्रे होणार आहेत.
या पत्रकार परिषदेला सनातनचे संत सद्गुरू सत्यवान कदम, मंदिर महासंघाचे राष्ट्रीय संघटक सुनील घनवट, श्री दत्त मंदिर न्यास माणगावचे सचिव दीपक साधले, अध्यक्ष सुभाष भिसे, प.पु. अण्णा महाराज रावळ सेवा ट्रस्ट पिंगुळीचे विश्वस्त सुरेश बिर्जे, हिंदू जनजागृती समितीचे राजेंद्र पाटील, मंदिर महासंघाचे जिल्हा संघटक यशवंत परब आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page