⚡वैभववाडी ता.०७-: नावळे ग्रामस्थ आयोजित नावळेगाव मर्यादित नावळे प्रीमियर 2025 क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे. हे क्रिकेट सामने श्री भगवती देवी देवीच्या भव्य दिव्य पटांगणावर शनिवार दिनांक 8 फेब्रुवारी ते 9 फेब्रुवारी 2025 ला सकाळी 9.30 वाल्यापासून सुरू होणार आहेत.
नावळे ग्रामस्थ आयोजित नावळे प्रीमियर 2025 मुंबई येथे वास्तव्यात असणाऱ्या नावळे गावातील तरुणांनी ह्याच आयोजन भव्य दिव्य असे स्वरूपात केले आहे या नावळे प्रीमियर क्रिकेट स्पर्धेसाठी नावळे गावातील मुंबई येथे वास्तव असणारे शेकडो तरुण या प्रीमियर साठी उपस्थित होणार आहेत हे क्रिकेट सामने नावळेगाव मर्यादित असून दहा संघ मालक व 10 संघ मालकाने आपल्याच गावातील तरुण घेऊन 10 संघ तयार केले आहेत आणि हे 10 संघ परस्पर विरोधात खेळणार आहेत. नावळे प्रीमियर 2025 चा आयोजनामुळे नावळे गावात उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे.
नावळे ग्रामस्थांच्या वतीने 8 व 9 फेब्रुवारी दरम्यान भव्य क्रिकेट सामन्यांचे आयोजन…
