श्री गवळदेवचा २७ वा मूर्ती प्रतिष्ठापना सोहळा ६ फेब्रुवारी पासून…

⚡कुडाळ ता.०३-: येथील श्री गवळदेव मूर्ती प्रतिष्ठापनाचा २७ वा वर्धापन दिन सोहळा गुरुवार दिनांक ६ फेब्रुवारी आणि शुक्रवार दिनांक ७ फेब्रुवारी २०२५ रोजी आयोजित करण्यात आला आहे. त्यानिमित्ताने विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
श्री गवळदेव मित्र मंडळ कुडाळ यांच्यावतीने श्री गवळदेव मूर्ती प्रतिष्ठापनाचा २७ वा वर्धापन दिन साजरा होणार आहे. या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत. गुरुवार दिनांक ६ फेब्रुवारी रोजी सकाळी १० ते १२ या वेळेत पहिली ते दुसरी आणि तिसरी ते चौथी या मुलांसाठी चित्रकला स्पर्धा होणार आहेत. दुपारी ३ ते ४ या वेळेत लहान मुलांच्या स्पर्धा आणि कार्यक्रम, सायंकाळी ४.३० वाजता महिलांसाठी विविध स्पर्धा आणि कार्यक्रम, सायंकाळी ७ वाजता श्रींची आरती, रात्री ८ ते ९ जादूगार यशराज यांचे जादूचे प्रयोग तर रात्री नऊ वाजता खेळ पैठणीचा होणार आहे. तसेच अयोध्या श्रीराम सोहळा, छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळा, पुष्पा २ कालीमाता देखावा आणि चिमणी पाखर डान्स अकादमी यांचा नृत्य आविष्कार हे खास कार्यक्रम होणार आहेत.
शुक्रवार दिनांक ७ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ६.३० ते ८ या वेळेत नामस्मरण व श्रींची नित्य पूजा, सकाळी ८ ते दुपारी २ वाजेपर्यंत लघुरुद्र, दुपारी बारा वाजता महाआरती, १२.३० ते ४.३० महाप्रसाद होईल. सायंकाळी ५ ते ६ दरम्यान हरिपाठ (सद्गुरु श्री वामनराव पै), सायंकाळी ७ वाजता श्रींची आरती, रात्री ८ ते ९.३० श्रींची पालखी मिरवणूक, रात्री ९.३० ते १०.३० श्री ब्राह्मणदेव मित्र मंडळ कुडाळ यांचे सुश्राव्य भजन, रात्री ११ वाजता खानोलकर पारंपरिक दशावतार नाट्य मंडळ खानोली यांचा महान नाट्यप्रयोग ‘लग्न आधी बाप’ असे कार्यक्रम होणार आहेत.
या श्री गवळदेव मूर्ती प्रतिष्ठापना सत्ताविसाव्या वर्धापन दिन सोहळ्याला भाविकांनी उपस्थित राहावे असे आवाहन श्री गवळदेव मित्र मंडळ कुडाळ यांच्या वतीने करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page