वैभववाडीत भरदिवसा अडीच तोळ्याचे दागिने चोरीला…

⚡वैभववाडी ता.०३-: तिरवडे तर्फे सौंदळ येथील गजानन परशुराम इंदुलकर ( माळवाडी ) यांच्या घरातून दिवसा अडीच तोळ्याचे दागिने चोरीला गेलेचा प्रकार शनिवारी १ फेब्रुवारीला सकाळी ११ ते दुपारी ३ वाजण्याच्या दरम्यान घडला. पोलीस स्टेशनला तक्रार देऊन अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इंदुलकर दांपत्य मुंबईवरून ३ डिसेंबरला गावी आले होते. शनिवारी सकाळी वाडीत गणेश जयंती कार्यक्रमास गेले होते. या दरम्यान भर दिवसा त्यांच्या घराचा दरवाजा फोडून बेडमध्ये बागेत ठेवलेल्या सोन्याच्या दोन तोळ्याच्या चार बांगड्या, अर्ध्या तोळ्याचे कानातल्या पट्टया व एक हजार रुपये चोरट्यांनी लंपास केले. कार्यक्रमावरून परतल्यानंतर इंदुलकर यांना ही गोष्ट लक्षात आली. त्यांनी याप्रकरणी सोमवारी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस रणजीत सावंत करीत आहेत.

You cannot copy content of this page