जिल्हास्तरीय हॅकथॉन स्पर्धेमध्ये वराडकर हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी उमटविला ठसा…

⚡मालवण ता.०१-:
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र पुणे आणि जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, सिंधुदुर्ग यांच्यावतीने न्यू इंग्लिश स्कूल, कसाल येथे आयोजित जिल्हास्तरीय हॅकथॉन स्पर्धेत कट्टा येथील वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय या प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी चार अभिनव व प्रभावी प्रकल्प सादर करून आपला ठसा उमटवला. यावेळी डायट प्राचार्य श्री राजेंद्र कांबळे व वरिष्ठ अधिव्याख्याता डॉ. सुरेश माने यांनी वराडकर हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या प्रकल्पांची प्रशंसा करत त्यांच्या सर्जनशीलतेचे विशेष कौतुक केले.

या स्पर्धेत शेती संरक्षक यंत्र- सहभागी विद्यार्थी: वैष्णवी गोळवणकर, मिताली पाटकर (मार्गदर्शक शिक्षक: श्री. महेश भाट), इलेक्ट्रोलॅसिस (विद्युत अपघटन)- सहभागी विद्यार्थी: स्वरा पेंडूरकर, ईशा ताम्हणकर (मार्गदर्शक शिक्षक:सौ. वीणा शिरोडकर), सुरक्षित क्यूआर कोड वापरा- सहभागी विद्यार्थी: वेदांत म्हाडगूत, श्रीपाद पाटील (मार्गदर्शक शिक्षक: श्री. प्रकाश कानूरकर), प्लास्टिक बॉटल्सचा पुनर्वापर- सहभागी विद्यार्थी: चंदना शेटये, जान्हवी भोसले, (मार्गदर्शक शिक्षक: श्रीमती अमिषा परब) हे प्रकल्प वराडकर हायस्कुलच्या विद्यार्थ्यांनी सादर केले. या यशस्वी सहभागामुळे वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे नाव जिल्ह्यात उंचावले आहे.

कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे विश्वस्त श्री. शिवानंद वराडकर, ऍड. सोनू पवार, अध्यक्ष श्री. अजयराज वराडकर, सचिव श्री. सुनील नाईक, श्रीमती विजयश्री देसाई व मुख्याध्यापिका सौ. देवयानी गावडे यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देत यशस्वीतेसाठी शुभेच्छा दिल्या होत्या. तसेच पंचक्रोशीतील ग्रामस्थानी या यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

You cannot copy content of this page