तळाशील येथे मॅरीड- अनमॅरीड कपल डान्स स्पर्धेचे आयोजन…

⚡मालवण ता.०१-: मालवण तालुक्यातील तोंडवळी तळाशील येथील श्री गोपाळ कृष्ण मूर्ती प्रतिष्ठापनेच्या ४७ व्या वर्धापन दिनानिमित्त गुड बॉईज ग्रुप तळाशील यांच्या तर्फे मॅरीड अनमॅरीड – कपल डान्स डबल धमाका या नृत्य स्पर्धेचे आयोजन दि. ११ फेब्रुवारी रोजी रात्री १० वा. गोपाळ कृष्ण रंगमंच, तळाशील या ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे.

या स्पर्धेत मॅरीड कपल डान्स गट व अनमॅरीड कपल डान्स गट या दोन्ही गटातील साठी प्रथम तीन विजेत्यांना प्रत्येकी अनुक्रमे रु. ७७४७, रु. ५५४७, रु. ३३४७ तसेच चषक असे पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे. माहिती व नावनोंदणी साठी स्वप्नेश 7262010719, राजू 7977345600 यांच्याशी संपर्क साधावा, नाव नोंदणी ८ फेब्रुवारी रोजी रात्री १० वाजेपर्यंत करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page