माझ्या पालकमंत्री पदात देवगडचा सिंहाचा वाटा…

मंत्री नितेश राणे:देवगड किल्ला येथील गणेश जयंती उत्सवात पालकमंत्री नितेश राणे यांनी दिली भेट..

देवगड (प्रतिनीधी)

गतवर्षीच्या गणेश जयंती उत्सवाच्या निमित्ताने या ठिकाणी दर्शनासाठी आलो होतो यावेळी मंडळाचे अध्यक्ष नंदकुमार घाटे यांनी आपला आमदार मंत्री म्हणून येऊन देत असे साकडे गणरायाकडे घातले होते. ते आज खऱ्या अर्थाने पूर्ण होत असून पालकमंत्री म्हणून माझ्याकडे आता जबाबदारी आली आहे. मात्र माझ्या पालकमंत्री या पदात देवगड तालुक्याचा सिंहाचा वाटा असल्याचे नामदार नितेश राणे यांनी सांगत या पुढील काळात देवगड तालुक्यातील जनतेचे येथील मच्छीमार बांधवांचे प्रश्न सोडविण्यासाठी सर्वाधिक प्राधान्य दिले जाईल व त्यासाठी आपण सदैव कटिबद्ध आहोत असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य मत्स्य व्यवसाय बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे यांनी देवगड किल्ला येथील गणेश जयंती उत्सवादरम्यान केले.
यादरम्यान श्री गणपती उत्सव मंदिर उत्सव समिती देवगड किल्ला मंडळाच्या वतीने अध्यक्ष नंदकुमार घाटे यांच्या हस्ते मंत्री नितेश राणे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी माजी आमदार ॲड अजित गोगटे, जिल्हा सरचिटणीस संदीप साटम, बाळा खडपे उपनगराध्यक्ष मिताली सावंत,माजी नगराध्यक्ष योगेश चांदोस्कर, दयानंद पाटील, नगरसेवक सौ तन्वी चांदोस्कर,सौ सावी लोके,न्यासाचे उपाध्यक्ष शिवराम निकम, सदस्य गुरुनाथ वाडेकर, केदार तेली ,उल्हास मणचेकर, अमित गोळवणकर आधी उपस्थित होते.

    देवगड किल्ला येथे गणेश जयंती उत्सवाच्या निमित्ताने सकाळी श्रींची पूजा अभिषेक व सत्यनारायण महापूजा झाल्यानंतर भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती दुपारी महाप्रसादासाठी ही मोठ्या प्रमाणात गरजे होती महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ व स्थानिक भजने तसेच इतर सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन यावेळी करण्यात आले होते
You cannot copy content of this page