संत राऊळ महाराज महाविद्यालयात १ फेब्रुवारीला राष्ट्रीय चर्चासत्र…

सामाजिक शास्त्र, इंग्रजी साहित्य आणि ग्रंथालय शास्त्र यांमधील नवे प्रवाह:देशभरातून तज्ज्ञ मार्गदर्शकांची उपस्थिती..

कुडाळ : संत राऊळ महाराज महाविद्यालय, अर्थशास्त्र विभाग, इंग्रजी विभाग, ग्रंथालय विभाग आणि ICSSR (WRC), Mumbai. यांच्या संयुक्तविद्यमाने ”सामाजिक शास्त्र, इंग्रजी साहित्य आणि ग्रंथालय शास्त्र यांमधील नवे प्रवाह” या विषयावर १ फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या चर्चासत्रात देशभरातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि चर्चासत्र होणार आहे. या चर्चासत्राचा उद्देश विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना सामाजिक शास्त्र, इंग्रजी साहित्य, तसेच ग्रंथालय क्षेत्रातील नवे प्रवाह आणि तंत्रज्ञानाविषयी माहिती मिळणार आहे.अशी माहिती डॉ. बी. ए. तुपेरे यांनी दिली.
या चर्चासत्रातून वरील तीनही विषयावरील नवे प्रवाह तसेच विविध आधुनिक तंत्रज्ञानाचा आणि इंटरनेट आणि सोशल मीडिया यांचा प्रभाव आणि त्यातून होणारे बदल याविषयीची सखोल माहिती विविध विषयातील तज्ञ मार्गदर्शक करणार आहेत. त्याचबरोबर देशभरातील विविध विषयांमधील संशोधक या माहितीमध्ये भर टाकणार आहेत. तसेच विद्यार्थी, शिक्षक आणि संशोधक यांना आधुनिक युगात विविध विषयातील नवीन माहिती या चर्चासत्रातून मिळणार आहे. सर्व विद्यार्थ्यांना, शिक्षकांना आणि संशोधकांना या चर्चासत्रात सहभागी होण्याची संधी देण्यात आली आहे.
या चर्चासत्रासाठी देशभरातून विविविध मान्यवर तज्ञानी ८० पेक्षा जास्त संशोधक पेपर पाठविले आहेत. अनेक मान्यवर तज्ञ या चर्चासत्राला मार्गदर्शन करणार आहेत. त्यामध्ये सोमय्या विद्यापीठातील ग्रंथपाल डॉ. वयजंडे, बांदा महाविद्यालयाचे डॉ. डी. जे. जोशी, लांजा कॉलेजचे प्रा. डॉ. के. आर. चव्हाण असे अनेक मान्यवर या चर्चासत्रात मार्गदर्शन करणार असल्याचे डॉ. तुपेरे यांनी सांगितले. यावेळी प्राचार्य डॉ. स्मिता सुरवसे, प्रा. योगेश कोळी, प्रा. जमदाडे, प्रा. जांभळे, प्रा. शरयू असोलकर, प्रा. संतोष वालावलकर, प्रा. रवींद्र गावडे आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page