संत राऊळ महाराज कॉलेजमध्ये इन्स्पायर कॅम्पचे आयोजन…

अकरावी सायन्सच्या टॅलेंटेड विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी:नामवंत शास्त्रज्ञ, शिक्षणतज्ञ, संशोधक यांची संवादात्मक सत्रे..

⚡कुडाळ ता.२९-: संत राऊळ महाराज कॉलेज कुडाळ व विद्यानिकेतन कॉन्व्हेंट स्कूल कसाल यांच्या संयुक्त विद्यमाने ४ फेब्रुवारी ते ८ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत अकरावी विज्ञान शाखेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी DST-INSPIRE CAMP संत राऊळ कॉलेज कुडाळ या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे. या शिबिरामध्ये संपूर्ण राज्यातील ९ जिल्ह्यांतील ३७ शाळातील २०० विद्यार्थी सहभागी झाले आहेत.अशी माहिती संत राऊळ महाराज महाविद्यालयाच्या प्राचार्य स्मिता सुरवसे आणि प्रा. योगेश कोळी यांनी दिली. या शिबिरात देशभरातील आघाडीच्या संस्थांमधील नामवंत शास्त्रज्ञ, शिक्षणतज्ञ, संशोधक यांची संवादात्मक सत्रे आयोजित करण्यात आली आहेत. अशा प्रकारचा कॅम्प सिंधुदुर्ग जिल्हयात प्रथमच होत आहे. त्याचा लाभ येथील विद्यार्थ्यांना होणार आहे.
यावेळी बोलताना डॉ. सुरवसे आणि प्रा. कोळी यांनी सांगितले, भारत सरकार विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग तर्फे मूलभूत विज्ञान, अभियांत्रिकी आणि वैद्यकशास्त्रातील संशोधन आणि नवकल्पनांना प्रोत्साहन देण्यासाठी inspire camp चे आयोजन करण्यात येते. यावर्षी प्रथमच सिंधुदुर्गला हा सन्मान मिळाला असून सिंधुदुर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे.
विद्यार्थ्यांसाठी पात्रता निकष हा इयत्ता दहावीच्या बोर्ड २०२४ परीक्षेत टॉप १% विद्यार्थी असतील .‌ या शिबिरात सहभागी होण्याकरिता एसएससी बोर्ड परीक्षेत ९३.६ %, सीबीएससी बोर्ड ९६%, आयसीएससी बोर्ड ९७.८३% किमान गुण असणे आवश्यक आहे. व विद्यार्थी अकरावी सायन्स शाखेत प्रवेश घेतलेला असावा.‌
या पाच दिवसीय शिबिरात भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित, जीवशास्त्र व अर्थसायन्स या विषयावर व्याख्याने, संवाद, तसेच हँडसऑन ऍक्टिव्हिटी व प्रयोग, प्रश्नमंजुषा, चर्चासत्रे यांचा समावेश असेल. हे शिबिर निवासी असून विद्यार्थ्यांकरता पूर्णत: मोफत आहे. विज्ञानाच्या सर्व क्षेत्रामध्ये व्याख्यानाच्या माध्यमातुन मार्गदर्शक आणि विद्यार्थ्यांमध्ये संवादाचे हे खुले मैदान मुलांसाठी उपलब्ध होणार आहे त्यामुळे मुलांच्या जिज्ञासेला चालना मिळणार आहे. तसेच त्यांना लहान वयातच त्यांचे करियर निवडण्यासाठी मदत होणार आहे. या शिबिरात विद्यार्थ्यांना एक्सपोजर दिले जाईल.
या शिबिरात देशभरातील आघाडीच्या संस्थांमधील नामवंत शास्त्रज्ञ, शिक्षणतज्ञ, संशोधक यांची संवादात्मक सत्रे आयोजित करण्यात आली आहेत. कोलकत्ता तिरुअनंतपुरम, भोपाळ बेहरामपूर आईसरचे चेअरमन व ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अरविंद नातू, डॉ. बास बापट, डॉ सोलापूरकर, डॉ. विभास शेवडे, डॉ उमाकांत रापोल, डॉ मनवा दिवेकर, डॉ. आचार्य , डॉ. श्रेयस माणगावे डॉ. सुधा राजमनी, डॉ. अविनाश कुंभार, प्रोफेसर नाडकर्णी, प्रोफेसर अशोक रुपनर यांच्या मार्गदर्शनाचा लाभ विद्यार्थ्यांना मिळणार आहे.
. दीड तासाची एकूण दहा व्याख्यान सत्रे व दर दिवशी साडेतीन तासाची प्रॅक्टिकल सत्रे असतील तसेच सायंकाळी सहा ते साडेसात या वेळेत विविध विषयावर चर्चा व प्रश्नमंजुषा यांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे सहभागी विद्यार्थ्यांना हँडस ऑन ऍक्टिव्हिटी व प्रयोगामध्ये व्यस्त राहण्याची संधी मिळेल. त्यांना व्यावहारिक अनुभव आणि वैज्ञानिक संकल्पनांची सखोल माहिती तसेच या शिबिरात वैज्ञानिक क्षेत्रातील तज्ञांशी विद्यार्थी संवाद साधू शकणार आहेत. विद्यार्थ्यांना अनेक संशोधन क्षेत्रे आणि सर्वोच्च भारतीय वैज्ञानिक संस्थांमध्ये उपलब्ध संशोधन सुविधा बद्दल माहिती दिली जाईल.
सकाळच्या व दुपारच्या सत्रात दररोज दोन व्याख्याने असतील. आंतरराष्ट्रीय शास्त्रज्ञ, भटनागर पुरस्कार विजेते राष्ट्रीय तसेच केंद्रीय राज्य विद्यापीठे यासारख्या आंतरराष्ट्रीय संस्था मधील १५ तज्ञांचे त्यांच्या वैज्ञानिक अनुभवांसह विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळणार आहे.
सर्व सहभागी विद्यार्थ्यांना शिबिराच्या पाचही दिवस निवास व्यवस्था, नाष्टा, अल्पोपहार जेवण आणि अभ्यासाचे साहित्य दिले जाईल. हे शिबीर DST प्रायोजित असल्याने विद्यार्थ्यांकडून या शिबिरासाठी कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही.
या शिबिरामध्ये महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, पुणे, रत्नागिरी, वर्धा, मुंबई, सातारा, नांदेड अशा नऊ जिल्हयातील ३७ शाळामधील २०० विद्यार्थी सहभागी झाले आहेत. त्यांची निवासाची व्यवस्था देखील करण्यात आली आहे. अशी माहिती प्राचार्य डॉ. स्मिता सुरवसे यांनी दिली.
यावेळी प्राचार्य डॉ. स्मिता सुरवसे, विद्यानिकेतन कॉन्व्हेंट स्कूल कसालच्या सुषमा केणी, रुपारेल कॉलेजचे सेवानिवृत्त प्राध्यापक ना. द. नाडकर्णी, प्रा. योगेश कोळी, प्रा. जमदाडे, प्रा. जांभळे, प्रा. शरयू असोलकर, प्रा. संतोष वालावलकर, प्रा. रवींद्र गावडे, डॉ. बी ए तुपेरे आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page