हवालदार विकास परब यांचा अणसूर हायस्कूलतर्फे सन्मान…

वेंगुर्ला प्रतिनिधी- भारतीय प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून अणसूर पाल हायस्कूल येथे देशाच्या सीमेचे रक्षण करण्यासाठी सध्या भारतीय सैन्यदलात कार्यरत असणारे शाळेचे माजी विद्यार्थी हवालदार विकास सुरेश परब यांचा सपत्नीक शाल, श्रीफळ, सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी शालेय समिती चेअरमन एम.जी.मातोंडकर, मुख्याध्यापक राजेश घाटवळ, शिक्षिका अक्षता पेडणेकर, चारुता परब, शिक्षक विजय ठाकर व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.

You cannot copy content of this page