⚡बांदा ता.२७-: भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या १०० व्या जयंती निमित्त भारतीय जनता पार्टी बांदा शहर यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रंगभरण आणि चित्रकला स्पर्धेला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे.
बालवाडी ते इयत्ता दुसरी गट – प्रथम तीन क्रमांकानुसार- अत्रेया काणेकर, प्राची मांजरेकर, ज्ञानदा गवस. इयत्ता तिसरी ते इयत्ता पाचवी गट – आदिती सावंत, काव्या चव्हाण, विहान गवस. इयत्ता सहावी ते इयत्ता आठवी गट – तन्वी धारगळकर, समर्थ केसरकर, अब्दुलगणी अशरफ अली खान. खुला गट – सूर्यकांत चव्हाण.
शहरातील आळवाडा येथील अटल बिहारीं वाजपेयी उद्यानात ही स्पर्धा संपन्न झाली. यावेळी सरपंच प्रियांका नाईक, उपसरपंच आबा धारगळकर, भाजपा महिला जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर, भाजप शहर अध्यक्ष बाबा काणेकर, ग्रामपंचायत सदस्य तनुजा वराडकर, श्रेया केसरकर, रेश्मा सावंत, केदार कणबर्गी, अक्षय मयेकर, सुनील राऊळ, गुरु कल्याणकर, राकेश केसरकर, शैलेश केसरकर आदी उपस्थित होते.
बांद्यात रंगभरण आणि चित्रकला स्पर्धेला उस्फुर्त प्रतिसाद…!
