⚡वेंगुर्ला ता.२४-: भारतीय जनता पार्टी सिंधुदुर्गद्वारा आयोजित संविधान गौरव अभियान अंतर्गत वेंगुर्ला हायस्कूल येथे आयोजित केलेल्या वक्तृत्व स्पर्धेत न्यू इंग्लिश स्कूल उभादांडाच्या अमृता नवार हिने प्रथम क्रमांक पटकाविला.
स्पर्धेचे उद्घाटन ज्येष्ठ नागरिक संघाचे तालुकाध्यक्ष तथा माजी मुख्याध्यापक शामराव काळे यांच्या हस्ते झाले. यावेळी संविधान गौरव अभियान जिल्हा संयोजक प्रसन्ना देसाई, वेंगुर्ला हायस्कूलचे मुख्याध्यापक प्रमोद कांबळे, परीक्षक प्रा.बाबुराव खवणेकर, प्रा.डॉ.पी.आर.गावडे, पत्रकार दाजी नाईक, प्र.वैभव खानोलकर, प्रा.डॉ.सचिन परुळकर, सर्पमित्र महेश राऊळ आदी उपस्थित होते.
स्पर्धेत प्रथम-अमृता नवार (न्यू.इं.स्कूल उभादांडा), द्वितीय-प्रणाली आव्हाडा, तृतीय-निधी सारंग (बावडेकर विद्या.शिरोडा), उत्तेजनार्थ-दिप्ती गवसकर (सरस्वती विद्या.टांक), चाहत शुक्ला (वेंगुर्ला हायस्कूल) यांनी मिळविला. विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते रोख परितोषिक व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
