⚡वेंगुर्ला ता.२४-: पीएम विश्वकर्मा अंतर्गत सिधुदुर्गातील सुतार व्यावसायीकांना प्रशिक्षण देण्यात आले. सावंतवाडी येथे घेण्यात आलेल्या या प्रशिक्षणाला जिल्ह्यातील दहा सुतार व्यावसायीकांनी सहभाग नोंदवला.
शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी आयटीआयचे विश्वकर्मा समन्वयक व गटनिदेशक सुचिता नाईक, सिधुदुर्ग जिल्हा समन्वयक बाळकृष्ण पांडव, विश्वकर्मा सिधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष शरद मेस्त्री, सदस्य दिनेश मेस्त्री, कौशल्य विकास अधिकारी नामदेव सावंत, गटनिदेशक आर.ए.जाधव, ट्रेनर सिद्धेश प्रभूखानोलकर, दाभोलकर, इंगळे, माळकर आदी उपस्थित होते.
या शिबिरात जिल्ह्यातील आनंद सुतार, महेश्वर सुतार, यशवंत गोडे (माणगांव), संतोष मेस्त्री (वेंगुर्ला), ओमकार गावडे (फोंडाघाट), नारायण मेस्त्री (तेंडोली), तेजस मेस्त्री (घोडगे), गणेश वाळके (कणकवली), शरद पांचाळ (मोरगांव) यांनी सहभाग घेऊन प्रशिक्षणाचा लाभ घेतला. तज्ज्ञ मार्गदर्शकांतर्फे शिबिरार्थींना प्रशिक्षण देण्यात आले.
पीएम विश्वकर्मा अंतर्गत सुतार व्यावसायीकांना प्रशिक्षण…
