आमदार म्हात्रे यांच्या फंडातून शैक्षणिक साहित्य वितरण…!

⚡वेंगुर्ला ता.२४-: कोकण विभागाचे शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या आमदार स्थानिक विकास कार्यक्रम सन २०२४-२५ अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ, दोडामार्ग, वेंगुर्ला आणि सावंतवाडी या ४ तालुक्यातील ३५ शाळांना डिजिटल ई लर्निंग इक्विपमेंट (शैक्षणिक साहित्य) वाटप करण्यात आले.

  यावेळी भाजपा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई, शिवसेना तालुकाप्रमुख अरविद करलकर, यशवर्धन राणे, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सर्वेश पावसकर, स्वरूप वाळके, रविराज नार्वेकर, जिल्हा व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण अधिकारी अनिल मोहरे, जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष वामन तर्फे,  लतेश मामा नांदगावकर, खरात सर, ठाकरे सर, साळवी सर आणि सर्व शाळांचे मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या दोन वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांच्या आमदार फंडातून १ कोटी २५ लाखाचे साहित्य ई लर्निंगचे सर्व शाळांना दिले आहे. तसेच जिल्हा नियोजन फंडातून त्यावेळचे पालकमंत्री रविद्र चव्हाण यांच्याकडून २ कोटीचे सोलर पॅनल व २ कोटीचे संगणक मंजूर करून घेतले असून त्याचेही वितरण लवकरच होणार आहे.
You cannot copy content of this page