वैभववाडी ठाकरे शिवसेनेकडून हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे जयंती साजरी…!

⚡वैभववाडी ता.२३-: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने वैभववाडी येथील मध्यवर्ती कार्यालयात हिंदुहृदय सम्राट,वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी करून त्यांना अभिवादन करण्यात आले. व ग्रामीण रुग्णालय वैभववाडी येथे फळांचे वाटप करण्यात आले.
यावेळी तालुकाप्रमुख मंगेश लोके, उपजिल्हाप्रमुख नंदू शिंदे, युवासेना जिल्हा सरचिटणीस स्वप्निल धुरी, जिल्हा कार्यकारिणी सदस्य संदीप सरवणकर, युवासेना तालुकाप्रमुख रोहित पावसकर, महिला आघाडी प्रमुख नलिनी पाटील, माजी जि.प.सदस्या दिव्या पाचकूडे,नगरसेवक मनोज सावंत, लोरे विभाग प्रमुख सूर्यकांत परब, महिला शहर प्रमुख मानसी सावंत, उपविभाग प्रमुख यशवंत गवाणकर, राजेश तावडे, उपविभाग प्रमुख स्वप्निल रावराणे, युवासेना विभाग प्रमुख गणेश पवार, कोळपे सरपंच सुनील कांबळे, सोनाळी शाखाप्रमुख अनिल कदम, कोकिसरे शाखाप्रमुख अनंत नांदलस्कर, दीपक पवार राजाराम गडकर आदी शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

You cannot copy content of this page