*वैभववाडी शहरातील बंद पडलेले सीसीटीव्ही कॅमेरे तात्काळ सुरू करा…

ठाकरे सेनेची मागणी: प्रशासनाला निवेदन सादर..

⚡वैभववाडी ता.२३-: वैभववाडी शहर हे तालुक्याचे मुख्य ठिकाण असून नेहमीच नागरिकांची वर्दळ असते वय बॉडी शहरातील लाखो रुपये खर्च करून वाघे वैभवी नगरपंचायत रे जनतेच्या सुरक्षिततेसाठी बसवलेले सीसीटीव्ही कॅमेरे गेली वर्षभर बंद अवस्थेत धुळखात पडलेले आहेत वावे वैभवी नगरपंचायतीच्या प्रशासनाची व सत्ताधारी नगरसेवकांचे याकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे.
तरी शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे तात्काळ दुरुस्त करून कार्यरत करण्यात यावेत अन्यथा शहरातील नागरिकांना घेऊन नगरपंचायत प्रशासनाला घेराव घालण्या येईल असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने निवेदनातून देण्यात आला आहे.
यावेळी तालुकाप्रमुख मंगेश लोके उपजिल्हाप्रमुख नंदू शिंदे युवा सेना सचिव स्वप्निल धुरी जिल्हा कार्यकारी सदस्य संदीप सरवणकर महिला आघाडी प्रमुख नलिनी पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य दिव्या पाचपुडे नगरसेवक मनोज उर्फ बंड्या सावंत लोरे विभाग प्रमुख सूर्यकांत परब वैभववाडी महिला प्रमुख मानसी सावंत उपविभाग शाखाप्रमुख यशवंत गव्हाणकर युवासेना तालुकाप्रमुख रोहित पावस्कर राजेंद्र तावडे उपविभाग प्रमुख स्वप्निल रावराणे युवासेना विभाग प्रमुख गणेश पवार कोळपे सरपंच सुनील कांबळे सोनाळी शाखाप्रमुख अनिल कदम दिलीप पवार राजाराम गडकर आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page