वैभववाडीत नदीवरील पूल पाडताना पोकलेन नदीत कोसळला ; चालक बचावला…!

⚡वैभववाडी ता.२३-: वैभववाडी एडगाव हद्दीवरील जूना सुख नदीवरील पूल पाडत असताना पोकलेन मशिन नदीत कोसळला या अपघातात चालक बालबाल बचावला आहे.
तराळा वैभववाडी कोल्हापूर मार्गाचे रस्ता रुंदी करण्याचे काम गेले वर्षभर चालू आहे वैभववाडी शहरालगत असलेल्या सुख शांती नदीवरील पूल नव्याने बांधण्यात येत आहे शांती नदीवरील पुलाचे काम सुरू झाले आहे सुख नदीवरील जुने पूल गुरूवारी पोकल्याने मशीनच्या सहाय्याने पाडण्यात येत होते फुल पाडत असताना सायंकाळी 3 वाजता दरम्यान पोकल्याण नदीत कोसळला या दुर्घटने चालक बाल-बाल बचावला आहे या घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली संबंधित ठेकेदार व अधिकारी ही घटनास्थळी दाखल झाले होते.

You cannot copy content of this page