महाविकास आघाडीच्या नगरसेवकांना व्हीप…

कुडाळ नगराध्यक्ष निवडणूक:सचेतक मंदार शिरसाट यांनी बजावला व्हीप..

कुडाळ : कुडाळ नगरपंचायतीतील महाविकास आघाडीच्या सर्व नगरसेवकांना महाविकास आघाडीचे मुख्य सचेतक तथा गटनेता मंदार श्रीकृष्ण शिरसाठ यांनी 24 जानेवारी रोजी होणाऱ्या नगराध्यक्षपदाच्या निवडणूकीत आघाडीच्या उमेदवार सौ सई देवानंद काळप यांना मतदान करावे यासाठी व्हीप बजावला आहे.
श्री शिरसाट यांनी कुडाळ नगरपंचायतीतील महाविकास आघाडीचे नगरसेवक ज्योती जयेद्र जळवी, श्रुती राकेश वर्दम, श्रेया शेखर गवंडे, आफरीन अब्बास करोल, अक्षता अनंत खटावकर, सई देवानंद काळप, मंदार श्रीकृष्ण शिरसाठ, उदय रामचंद्र मांजरेकर व किरण चंद्रकांत शिंदे या नऊही सदस्यांना बजावला आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, महाविकास आघाडीच्या सर्व कुडाळ नगरपंचायतीतील सर्व सदस्यांना ही सूचना दिली जाते की 24/1/2025 रोजी कुडाळ नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडी करता मतदान होणारे आहे. महाविकास आघाडीच्या सर्व सदस्यांना प्रस्तुत सचेतकीय परिपत्रकाने कळविण्यात येते की शुक्रवार दिनांक 24/1/2025 रोजी होणाऱ्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी तर्फे सई देवानंद काळप या अधिकृत उमेदवार आहेत. तरी महाविकास आघाडीच्या सर्व कुडाळ नगरपंचायतीच्या सदस्यांनी 24/1/25 रोजी दालनात उपस्थित राहून निवडणूक प्रक्रिये दरम्यान सकाळी दहा पंचेचाळीस ते एक वाजेपर्यंत हजर राहावयाचे आहे व पक्षाच्या भूमिकेनुसार महा विकास आघाडीचे भूमिकेनुसार आपली मते हे महाविकास आघाडीच्या नगराध्यक्षपदाच्या अधिकृत उमेदवार सौ सई देवानंद काळप यांना निवडणूक प्रक्रियेप्रमाणे द्यावयाचे आहे. ही नोटीस 22 जानेवारी 2025 रोजी दिली असून मंदार शिरसाठ यांची यावर स्वाक्षरी आहे. उर्वरित नऊ सदस्यांची नावे नमूद करण्यात आली आहेत आणि त्यांनाही नोटीस बजावण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे.

You cannot copy content of this page