जय मल्हार मिञमंडळाकडून नावळे येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन…

वैभववाडी प्रतिनिधी
जय मल्हार मित्र मंडळ नावळे, धनगरवाडा आयोजित भव्य,दिव्य अंडर आर्म क्रिकेट स्पर्धा, कबड्डी स्पर्धा,ज्येष्ठ नागरिक सत्कार, विद्यार्थी गुणगौरव सोहळा,शालेय साहित्य वाटप, हळदीकुंकू समारंभ आणि सैन्य दल भर्ती अग्निवीर जवानांचा सत्कार शनिवार दिनांक -25 जानेवारी 2025 रोजी आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष चंदू गुरखे, उद्घाटक नावळे सरपंच कुमारी सोनल गुरव प्रमुख पाहुणे वाभवे वैभववाडी नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष नेहा माईनकर व उपनगराध्यक्ष संजय सावंत आदी उपस्थित राहणार आहेत
*जय मल्हार मित्र मंडळ नावळे, धनगरवाडा या मंडळाला 22 वर्ष पूर्ण झाली, गेली 22 वर्ष हे मंडळ विविध कार्यक्रम दरवर्षी सातत्याने कार्यक्रमांचे आयोजन करून नावळे गावामध्ये भव्यदिव्य कार्यक्रम करत असते. तरी या भव्य दिव्य अशा कार्यक्रमाला नावळे गावासह पंचक्रुशीतील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आव्हान अध्यक्ष संजय गुरखे, सचिव सचिन गुरखे त्यांनी केले आहे

You cannot copy content of this page