सावंतवाडी सर्वोदनगर येथील रहिवाशांकडून १९ रोजी परिसर स्वच्छता मोहिमाच आयोजन…

⚡सावंतवाडी ता.१८-: सर्वोदनगर सावंतवाडी येथील रहिवाशांकडून १९ जानेवारी रोजी सकाळी ७ वा. परिसर स्वच्छता मोहिम राबविण्याचे ठरविले आहे. सावंतवाडी नगरपरिषद यांच्या सहकार्याने व रहिवाशांच्या स्वच्छतेच्या सामाजिक जाणीवेतून ही मोहीम आयोजित करण्यात आली आहे. नुकतेच सर्वोदय नगर येथील नागरिकांनी एकत्र येत सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम राबविण्याच्या दृष्टीने एक संघ निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा पहिला टप्पा हा स्वच्छ मोहीम असणार आहे. या मोहीमेसाठी नगरपरिषद मुख्याधिकारी सागर साळुंखे व पालिकेचे विशेष सहकार्य लाभले असून न.प. कर्मचारी यात सहभागी होणार आहेत. सकाळी ठीक ७ वा. मेघना राऊळ यांच्या घरासमोरील गार्डनमध्ये सर्व रहिवासी उपस्थित राहावे, त्या ठिकाणी स्वच्छतेची प्रतिज्ञा होणार आहे व मोहीमेस प्रारंभ होणार आहे. यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन सर्वोदय नगर रहिवासी संघाचे मुख्य प्रवर्तक सुनील राऊळ यांनी केल आहे.

You cannot copy content of this page