⚡सावंतवाडी ता.१७-: नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडी शहर शिवसेना उबाठा गटाच्या शहर संघटक पदी श्री निशांत चिंतामणी तोरसकर यांची नियुक्ती करण्यात आली.
आज ओरोस येथे शरद कृषी भवनमध्ये पार पडलेल्या शिवसेना ऊबाठा पक्षाच्या जिल्हा कार्यकारिणी बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या वेळी शिवसेना सचिव मा खासदार विनायक राऊत, संपर्क प्रमूख अरुण दुधवडकर, मेजर सुधीर सावंत, मा आमदार वैभव नाईक, राजन तेली, संदेश पारकर , सतीश सावंत, जान्हवी सावंत, संजय पडते,सावंतवाडी विधानसभा प्रमूख रुपेश रावुळ, तालुका प्रमूख मायकल डिसोझा , डॉ जयेंद्र परुळेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
