⚡मालवण ता.२९-: मुंबई येथील अमृता अशोक तांबे यांनी त्यांचे पती स्व. अशोक रामचंद्र तांबे यांच्या स्मरणार्थ १५० पुस्तके कट्टा येथील वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या ग्रंथालयास प्रदान केली. तसेच जयश्री जयराम धारपवार प्रतिष्ठान यांच्याकडूनही १५० दुर्मिळ पुस्तके प्रदान करण्यात आली.
या पुस्तकरुपी देणगी बद्दल कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री. अजयराज वराडकर यांनी जयश्री जयराम धारपावर प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. श्रीकांत धारपवार यांचे आभार मानले आहेत. या उपक्रमाबद्दल कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव श्री. सुनील नाईक, श्रीमती विजयश्री देसाई, शालेय समितीचे अध्यक्ष श्री, सुधीर वराडकर यांनी अभिनंदन केले. यावेळी वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. देवयानी गावडे,मराठी विभागप्रमुख श्री संजय पेंडूरकर, सहाय्यक शिक्षक श्री. के. एम. हडलगेकर श्रीमती जे. एन. मालवदे व विद्यार्थी उपस्थित होते
