⚡वेंगुर्ले ता.२९-:
श्री देवी सातेरी हायस्कूल व कै. सौ. गुलाबताई दीनानाथ नाईक कनिष्ठ महाविद्यालय, वेतोरेचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ गुरूवार २ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता श्री स्वामी समर्थ सभागृहात आयोजित केला आहे.
हा कार्यक्रम शिक्षण प्रसारक मंडळ वेतोरेचे अध्यक्षा स्मिता दामले यांच्या अध्यक्षतेखाली व प्रमुख पाहुणे शिक्षण प्रसारक मंडळ वेतोरेचे कार्याध्यक्ष दिगंबर नाईक, कार्यवाह प्रभाकर नाईक, उपकार्याध्यक्ष सूर्याजी नाईक, पालकरवाडी सरपंच सदाशिव पाटील, वरचीवाडी वेतोरे सरपंच प्राची नाईक यांच्या उपस्थितीत होणार आहे. आजी-माजी विद्यार्थ्यांसह पालक व शैक्षणिक हितचिंतकांनी उपस्थित राहवे, असे आवाहन मुख्याध्यापक संजय परब, सांस्कृतिक प्रमुख नीलेश पेडणेकर यांनी केले.
वेतोरे हायस्कूलचे २ जानेवारीला पारितोषिक वितरण…!
