मालवणात रोटरी क्लबतर्फे १३ रोजी पाढे पाठांतर स्पर्धा…

⚡मालवण ता.२९-: रोटरी क्लब ऑफ मालवण आयोजित व अपूर्व फर्नांडिस पुरस्कृत शालेय विद्यार्थ्यांसाठी मालवण तालुकास्तरीय पाढे पाठांतर स्पर्धा दि. १३ जानेवारी रोजी दुपारी २ ते ५ या कालावधीत येथील जय गणेश इंग्लिश स्कूल, मालवण येथे दोन गटात घेतली जाणार आहे. यामध्ये पहिला गट पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांना २ ते २० पर्यंत पाढे पाठांतर करायचे आहेत. त्यासाठी प्रथम तीन क्रमांकांना अनुक्रमे १००० रुपये, ७०० व ५०० रुपये अशी पारितोषिक देण्यात येतील. तर दुसरा गट आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना ११ ते ३० पर्यंत पाढे पाठांतर करायचे आहेत, त्यासाठी प्रथम तीन क्रमांकांना अनुक्रमे १२०० रुपये, १००० व ७०० रु. देऊन गौरविण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी ९४२२०७६८०५ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page