जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात रामगडच्या प्रगत विद्यामंदिरचे घवघवीत यश…

⚡मालवण ता.२९-: प्रादेशिक विद्या प्राधिकरण राज्य विज्ञान व गणित शिक्षण संस्था रविनगर,नागपूर व जिल्हा परीषद प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभाग, सिंधुदुर्ग तसेच कनेडी गट शिक्षण प्रसार मंडळ, मुंबई संचलित माध्यमिक विद्यामंदिर, कनेडी ता.कणकवली, यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ५२ व्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात मालवण तालुक्यातील प्रगत विद्यामंदिर, रामगड या प्रशालेने घवघवीत यश संपादन केले.

या विज्ञानप्रदर्शनात प्राथमिक विद्यार्थी विज्ञान प्रतिकृती स्पर्धेत प्रगत विद्यामंदिरच्या भक्ती नागेश परब व गौरी निलेश घाडीगांवकर (दोन्ही इयत्ता आठवी) या विद्यार्थिनींनी सादर केलेल्या प्रतिकृतीने तृतीय क्रमांक पटकावीला. तर माध्यमिक विद्यार्थी प्रतिकृती स्पर्धेत कु.ओमतेज उल्हास तारी (नववी) याने प्रथम क्रमांक पटकावीला. तसेच माध्यमिक दिव्यांग विद्यार्थी प्रतिकृती स्पर्धेत ओंमकार पंकज राणे व अर्थव बाबुराव मेस्त्री (नववी) यांनी प्रथम क्रमांक मिळविला. यां तिन्ही गटात यश मिळविलेल्या प्रगत विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड झाली आहे. या
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे प्रशालेतर्फे संस्था चालक, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

You cannot copy content of this page