मालवण बंदर जेटीसमोरील पार्किंगमधील मच्छिमारांचा पारंपारिक मार्ग खुला करा…

मंदार केणी व यतीन खोत यांची मागणी: बंदर विभागाचे वेदले लक्ष..

⚡मालवण ता.२८-: मालवण बंदरजेटी समोरील पार्किंग बंदर विभागाने निविदा प्रक्रिया करून खासगी ठेकेदाराला चालवण्यास दिले आहे. येथून मच्छीमारांचा किनाऱ्यावर येण्या जाण्याचा पारंपरिक मार्ग असून या ठेकेदाराने हा मार्ग बंद केला आहे. त्यामुळे मच्छिमारांबरोबरच अनेकांची गैरसोय होत असून पार्किंग मधील मच्छिमारांचा पारंपारिक मार्ग खुला करावा, अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रवक्ते मंदार केणी, माजी नगरसेवक यतीन खोत यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने बंदर विभागाकडे केली आहे.

याबाबतचे निवेदन मालवण बंदर विभागाचे अधिकारी श्री. परदेशी यांच्याकडे सादर करण्यात आले. यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे उपतालुकाप्रमुख गणेश कुडाळकर, शहर प्रमुख बाबी जोगी, नरेश हुले, हेमंत जोशी आदी उपस्थित होते.

मालवणच्या नवीन बंदर जेटी समोर पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे. बंदर विभागाने निविदा प्रक्रिया करून हे पार्किंग खाजगी ठेकेदारास चालविण्यास दिलेले आहे. पार्किंग होण्यापूर्वी किंवा नंतरही पारंपारिक मच्छीमारांना लिलावासाठी अथवा स्थानिक नागरिकांची येण्या जाण्यासाठी पारंपारिक रस्ता या ठिकाणी आहे. आमचा पार्किंगला विरोध नाही. परंतु पार्किंग मधून जाण्या येण्यासाठी रस्ता खुला ठेवावा. यामुळे पार्किंगसाठी कोणताही अडथळा निर्माण होणार नाही. तरी बाबत सहानुभूतीने विचार व्हावा, अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने या निवेदनातून करण्यात आली आहे.

You cannot copy content of this page