मालवणातील बंद असलेला रंगीत कारंजा सुरु…

आम. निलेश राणेंच्या बैठकीचा परिणाम:नागरिकांमधून समाधान व्यक्त..

⚡मालवण ता.२८-: मालवण नगरपालिकेच्या आढावा बैठकीत आम. निलेश राणे यांनी शहर विकासाबाबत आढावा घेत विकास कामात हलगर्जीपणा चालणार नसल्याचा इशारा अधिकाऱ्यांना दिल्यानंतर या बैठकीचे इम्पॅक्ट बैठकीच्या काही तासातच दिसून आले असून गेले काही महिने बंद असलेला फोवकांडा पिंपळ येथील गार्डनमधील रंगीत कारंजा प्रशासनामार्फत तातडीने कार्यान्वित करण्यात आला आहे. याबाबत नागरिकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

आमदार निलेश राणे यांनी काल मालवण नगरपालिकेला भेट देऊन प्रशासकीय आढावा बैठक घेतली होती. यावेळी आजची पहिलीच बैठक असल्याने आपण जास्त काही बोलणार नाही. मागील दहा वर्षात काय झालं ते झालं. पण आता आमदार बदललाय, त्यामुळे विकास कामात हयगय चालणार नाही. असा इशारा निलेश राणे यांनी दिला होता. या बैठकीत माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी मालवण फोवकांडा पिंपळ येथील गार्डन मधील रंगीत कारंजा कित्येक महिने बंद असल्याकडे लक्ष वेधत पालिका प्रशासनाच्या कारभारा बाबत नाराजी व्यक्त केली होती. याबाबत आवश्यक त्या सूचना आम. राणे यांनी नगरपालिका प्रशासनाला दिल्यानंतर प्रशासनाने तातडीने काही तासातच याची दुरुस्ती करून हा रंगीत कारंजा सुरु केला आहे. याबाबत गेले काही महिने सातत्याने मागणी होत होती. मात्र आमदार निलेश राणे यांच्या आढावा बैठकीत हा विषय उपस्थित होताच काही तासातच त्यावर कार्यवाही झाल्याने हा चर्चेचा विषय ठरला आहे.

You cannot copy content of this page