कॉसमॉस सहकारी बँकेच्या संचालक मंडळात अनुश्री माळगावकर यांची बिनविरोध निवड…

⚡बांदा ता.२६-: डिंगणे (ता. सावंतवाडी) येथील अनुश्री माळगावकर (पूर्वाश्रमीच्या छाया उत्तम सावंत) यांची कॉसमॉस सहकारी बँकेच्या नवीन संचालक मंडळात बिनविरोध निवड झाली आहे. त्यांच्या निवडीने डिंगणे दशक्रोशीतून अभिनंदन होत आहे.
बहुराज्यांत विस्तार असलेल्या कॉसमॉस बँकेची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच बिनविरोध पार पडल्याचे बँकेने जाहीर केले आहे. बँकेच्या विद्यमान संचालक मंडळाचा कार्यकाळ डिसेंबर २०२४ अखेर संपुष्टात येत आहे.
‘बहुराज्यीय सहकारी संस्था कायदा २००२’ मधील तरतुदीनुसार सहकार निवडणूक प्राधिकरण, नवी दिल्ली यांच्या मान्यतेनुसार यंदाची निवडणूक झाल्याचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी संजय राऊत यांनी जाहीर केले. संचालक मंडळातील एकूण १३ जागांसाठी १३ उमेदवारांकडूनच अर्ज सादर झाल्यामुळे निवडणूक बिनविरोध झाल्याचे श्री राऊत यांनी सांगितले.
विद्यमान संचालक मंडळातील ७ जणांचा नवीन संचालकांमध्ये समावेश असून, सहा लोकांना नव्याने संधी मिळाली आहे. यांच्या व्यतिरिक्त २५ उमेदवारांनी निवडणूक प्रक्रियेत माघार घेतल्याने, मतदान घेण्याची गरज भासली नाही. निवडून आलेल्या बँकेच्या संचालकांमध्ये, रसिका गुप्ता, सुरेखा जोशी, प्रवीणकुमार गांधी, अजित गिजरे, सुब्रमणियम संथानम, घनश्यामभाई अमिन, अॅड. प्रल्हाद कोकरे, सचिन आपटे, सीए यशवंत कासार, अरविंद तावरे, बाळासाहेब साठे, अनुश्री माळगावकर आणि रेखा पोकळे यांचा समावेश आहे. नवनिर्वाचित संचालक मंडळाचा कार्यकाळ २०२४-२५ ते २०२९- ३० असा पाच वर्षांसाठी असणार आहे.
अनुश्री मळगावकर या मुळ डिंगणे येथील आहे. त्यांच्या निवडीने परिसरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

You cannot copy content of this page