आयडिल इंग्लिश मिडियम इको स्कूल नेरूर चा आदर्श इतर शाळानी घ्यावा…

प्रा.खानोलकर:पर्यावरण पुरक वेशभूषा स्पर्धेतुन जनजागृती करण्याचा प्रयत्न कौतुकास्पद..

⚡वेंगुर्ला ता.२६-: आयडिय इंग्लिश मिडीयम इको स्कूल मध्ये वेशभूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आली होती वेशभूषा स्पर्धेला पर्यावरणाशी सागड घालत जैवविविधतेचे संवर्धन रक्षण या विषयावर संपन्न झालेल्या आगळ्या वेगळ्या वेशभूषा स्पर्धेत विद्यार्थ्यांनी केलेली पर्यावरण आणि जैवविविधतेचे घडवलेल्या दर्शन निश्चितच कौतुकास्पद आहे या उपक्रमाचा आदर्श इतर शाळानी घ्यावा असा विचार प्रा.वैभव खानोलकर यांनी या वेळी मांडला.
पर्यावरणाचा माणूस हा एक घटक आहे आणि पर्यावरण संवर्धन आणि संरक्षण ही काळाची गरज आहे हे विद्यार्थीच्या मनात रूजवण्यासाठी आयडियल इंग्लिश मिडियम इको स्कूल नेरूर यांनी ही उत्कृष्ट संकल्पना मांडली आणि या संकल्पनेतुन वेशभूषा स्पर्धेला पालक आणि विद्यार्थी यांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला
या स्पर्धेचे परिक्षण लोककला अभ्यासक,युवा व्याख्याते आणि सुप्रसिद्ध निवेदक, मुलाखतकार प्रा.वैभव खानोलकर यांनी केले.
ही स्पर्धा एकुण सहा गटात घेण्यात आली या मध्ये नर्सरी गटात
सुर्वी सावंत प्रथम तर व्दितीय जिजा गुरव
तृतीय प्रज्ञेश नाईक यांनी बाजी मारली
ज्यूनियर के.जी गटात
मानवी परब प्रथम
सुरेश पालयेकर व्दितीय आणि तृतीय दिगंबर हळदणकर
सिनियर के.जी
मध्ये प्रथम ओवी प्रभु केळुसकर व्दितीय विहान सरमळकर आणि तृतीय मीरा कदम पहिली दुसरी गटात प्रथम अद्वैत चव्हाण व्दितीय सौम्या मठकर तृतीय सौम्या चौधरी तिसरी चौथी गटात
दिशा राऊळ प्रथम
व्दितीय शनया कोचरेकर
तृतीय यज्ञेश पारकर
पाचवी सहावी गटात
प्रथम संस्कृती शर्मा
व्दितीय अनुरा चौधरी
तृतीय महादेव कलिंगण
यांनी यश मिळवले.
ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक सौरभ पाटकर यांच्या सह
चैतन्या चव्हाण, योगिता म्हाडदळकर, भूषण सारंग, वैभव आकेरकर, कीर्ती गावडे, श्रद्धा गोसावी, प्रतीक्षा दळवी, भक्ती फोंडेकर,कीर्ती चव्हाण, मिलिंद नाईक, अपर्णा म्हापणकर वैभव आकेरकर यांनी हा उपक्रम राबवण्यासाठी मेहनत घेतली तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आरोही तारी यांनी केले.
पारितोषिक वितरण वेळी व्यासपीठावर चेअरमन डॉ नंदिनी देशमुख
खजिनदार राजीव नेरूरकर, तसेच
मिलिंद नाईक आणि मुख्याध्यापक
सौरभ पाटकर या वेळी उपस्थित होते.
१९८३ मध्ये मुंबई विद्यापीठात दशावतार लोककलेवर पहिला प्रबंध सादर करणारे वेंगुर्ल्याचे सुपुत्र डॉ अशोक भाईडकर यांच्या संशोधनातुन साकारलेला दशावतार हा अडीच हजार किंमतीचा ग्रंथ आयडिय इंग्लिश मिडीयम इको स्कूलला या वेळी वैभव खानोलकर यांनी भेट म्हणून दिला
आयडियल इंग्लिश मिडीयम इको स्कूल मध्ये दशावतार लोककलेचे प्रशिक्षण वर्ग लवकर सुरू होणार असून या साठी डॉ भाईडकर यांच्या या ग्रंथ महत्त्वाची भुमिका ठरेल अशी भावना डॉ देशमुख यांनी बोलून दाखवली.
हा दशावतार ग्रंथ भेट स्वरूपात दिल्याबद्दल या प्रशालेचे मुख्याध्यापक सौरभ पाटकर सर यांनी प्रा. वैभव खानोलकर व डॉ . अशोक भाईडकर यांचे आभार व्यक्त केले
यावेळी पालक त्याचबरोबर शालेय समितीचे पदाधिकारी संस्था पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते

You cannot copy content of this page