दिपाली भालेकर ; निवेदनाव्दारे
उपवनसंरक्षकांचे वेधले लक्ष..
⚡सावंतवाडी ता.१५-: सावंतवाडी शहरासह भटवाडी बाहेरचावाडा परिसरात माकडांचा त्रास दिवसेनदिवस वाढत चालला आहे. त्यामुळे याचा तात्काळ बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी माजी नगरसेविका दिपाली भालेकर यांनी आज वनविभागाचे उप वनसंरक्षक श्री. रेड्डी यांच्याकडे निवेदनद्वारे केली आहे.
यावेळी भाजप महिला शहर अध्यक्ष मोहिनी मडगावकर, मेघना साळगावकर, मेघना भोगटे, अन्वी मेस्त्र, ज्योती मुद्राळे आदी उपस्थित होते.
