व्यवस्थापक प्रीती आर पटेल यांचे आवाहन..
ओरोस ता १६
महाराष्ट्र राज्य इतर मागासवगीय (ओबीसी) वित्त आणि विकास मर्यादीत, व उपकंपनी शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळ सिंधुदुर्ग यांचेमार्फत, स्वर्णीमा कर्ज योजना, मार्जिन मनी कर्ज योजना, बीज भांडवल कर्ज योजना अशा विविध कर्ज योजनेतंर्गत प्रवर्गातील लाभार्थीना स्वयंरोजगाराकरीता अल्प व्याजदराने कर्ज वितरीत करण्यात आलेले आहे. ओबीसी महामंडळाच्या जिल्हा कार्यालय सिंधुदुर्ग मार्फत सर्व योजनांमध्ये लाभ घेतलेल्या लाभाथीना संपूर्ण थकीत कर्ज रक्कमेचा एकरकमी भरणा करणाऱ्या लाभार्थीस थकीत व्याज रक्कमेत ५० टक्के सवलत देण्याबाबतची एकरकमी परतावा योजना ३१ मार्च २०२५ पर्यंत राबविण्यात येत आहे. त्यानुसार, महामंडळाच्या थकबाकीदार लाभार्थीनी सदर योजनेचा फायदा घेऊन कर्जमुक्त व्हावे व महामंडळाच्या नवीन कर्ज योजनांचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळ जिल्हा कार्यालय सिंधुदुर्ग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवन सिंधुदुर्गनगरी जिल्हा व्यवस्थापक ओटे यांच्यांशी संपर्क साधावा असे आवाहन, जिल्हा व्यवस्थापक प्रीती आर पटेल यांच्याकडून करण्यात आले आहे.
