ओरोस ता १६
परभणी गंगाखेड येथील डॉ. बाबसाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधानाच्या प्रतिकृतीतील अवमूल्यन करण्यात आले. या घटनेचा निषेध करण्यासाठी वंचित बहुजन आघाडी सिंधुदुर्गच्या पुढाकाराने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सामाजिक शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक कर्मचारी संघटना आणि संविधान मानणाऱ्या संघटना पुरोगामी पक्ष यांच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज अश्वारुढ पुतळा ओरोस-फाटा येथे १८ डिसेंबर २०२४ रोजी दुपारी दोन तासाचे धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. दुपारी साडेतीन ते साडेपाच या वेळेत हे आंदोलन लोकशाही मार्गाने होणार आहे, असे निवेदन जिल्हाधिकारी यांना वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष महेश परुळेकर यांनी दिले आहे.
१८ रोजी वंचित आघाडी करणार दोन तासांचे धरणे आंदोलन…
