“स्वामीकिरण दिनदर्शिके” चे प्रकाशन…

बांदा/प्रतिनिधी
‘स्वामीकिरण दिनदर्शिके’च्या पाचव्या आवृत्तीचे प्रकाशन आज मान्यवरांच्या उपस्थितीत येथील श्री देव बांदेश्वर-भूमिका मंदिरात करण्यात आले. ही दिनदर्शिका शहरातील नागरिकांसाठी विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे.


यावेळी देवस्थान समितीचे अध्यक्ष राजाराम उर्फ बाळु सावंत, दत्तप्रसाद कला क्रीडा युवक मंडळाचे सचिव शैलेश लाड, स्वामीकिरण परिवाराचे सदस्य पत्रकार निलेश मोरजकर, लाड मित्रमंडळाचे सचिव संदीप नार्वेकर, कर सल्लागार समीर परब, चित्रकार तथा शिक्षक हंसराज गवळे, प्रवीण गाड, युनिक फाऊंडेशन सिंधुदुर्गच्या सचिव सौ. रीना मोरजकर, नैतिक मोरजकर, मानकरी संजय सावंत आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मंदिरात श्रीफळ ठेऊन दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले.

You cannot copy content of this page