वृद्ध कलाकार मानधन निवड समिती उपाध्यक्षपदी प्रा.हरीभाऊ भिसे…

*💫कणकवली दि.१७-:* महाराष्ट्र शासन समाजकल्याण विभागामार्फत दिल्या जाणाऱ्या वृद्ध कलाकार व साहित्यिक मानधन निवड समितीवर सिंधुदुर्ग जिल्हा उपाध्यक्ष पदी प्रा. हरिभाऊ भिसे यांची निवड उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा पालकमंत्री सिंधुदुर्ग मा. उदयजी सामंत यांनी नुकतीच जाहीर केली आहे. प्रा. हरिभाऊ भिसे यांनी लोककला व साहित्यिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे यापूर्वी त्यांनी या जिल्हास्तरीय समितीवर सदस्य म्हणून काम केलेले आहे या समितीचे अध्यक्ष श्री. राजा सामंत आहेत. प्रा. हरिभाऊ भिसे हे गेली ३१ वर्षे कणकवली कॉलेज कणकवली येथे काम करत असून ज्ञानदा शिक्षण संस्थेच्या संस्थापक सचिव पदी कार्यरत आहेत व अक्षरसिंधु साहित्य कलमंचचे कार्याध्यक्ष तसेच सिंधुगर्जना ढोलताशा पथकाचे संस्थापक आहेत. जिल्ह्यातील वृद्ध कलाकार व साहित्यिकांना गेली अनेक वर्षे मानधन मिळवून देण्यामध्ये त्यांचे मोठे योगदान आहे. या निवडीबद्दल प्रा. हरिभाऊ भिसे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

You cannot copy content of this page