*💫कणकवली दि.१७-:* नूतन वर्ष व गुढीपाडव्याचे औचित्य साधून सुप्रसिद्ध अभिनेत्री अक्षता कांबळी यांचा दहावीच्या वर्ग मित्रांकडून फोंडा घाट ,साईमंदिर येथे शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. सौ.कांबळी यांनी अनेक चित्रपट ,वेबसिरीज ,सिरीयल मध्ये आपला अभिनय उत्तम प्रकारे सादर करून दाखवला आहे,हल्लीच रिलीज झालेल्या मुंबई सागा या हिंदी चित्रपटामध्ये त्यांची बॉलिवूड इन्ट्री झाली आहे . तसेच सद्या स्टार प्रवाह वरील “नवे लक्ष “या सिरीयल मध्ये त्या अभिनय करत आहेत.यासाठीच त्यांच्या वर्ग मित्रांनी त्यांचा मोटठ्या उत्साहाने सत्कार केला. यावेळी श्री मनीष गांधी ,शैलेंद्र आपटे ,संतोष पावसकर ,अविनाश चाचुरडे, दत्तात्रय नातू ,शिवाजी पवार ,संजय हळदीवे ,दिलीप इसवलकर ,शिवाजी राठोड ,विठोबा म्हसकर ,संतोष देसाई ,विनोद मर्ये ,सुनील कदम ,राजेंद्र मोर्ये उपस्थित होते ,तब्बल ३२ वर्षांनी एकत्र येत केलेला हा कार्यक्रम माझ्यासाठी अविस्मरणीय सोहळाच आहे असे उदगार सौ कांबळी यांनी आंनदाश्रूनी काढले.
सुप्रसिद्ध अभिनेत्री अक्षता कांबळी यांचा फोंडाघाट येथील वर्गमित्रांतर्फे सत्कार…
