राजन तेली:एकदा सेवा करण्याची संधी द्या तुम्हाला अपेक्षित विकास नक्कीचच करेन..
⚡सावंतवाडी ता.१०-: येथील मतदार संघाचे आमदार दीपक केसरकर यांच्या हेकेखोरपणा आणि हट्टीपणामुळे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल सारखा महत्त्वाचा प्रश्न मार्गी लागला नाही.त्यामुळे अशा निष्क्रिय आणि खोटारड्या आमदाराला घरी बसवा.केसरकरांनी मतदार संघाचा विकास केला तर साड्या का वाटाव्या लागतात असा सवाल महाविकास आघाडीचे उमेदवार राजन तेली यांनी आज येथे केला.सावंतवाडी तालुक्यातील नेमळे येथे गाव भेट दौरा आयोजित करण्यात आला होता यावेळी श्री तेली बोलत होते.
यावेळी त्यांनी केसर करांवर टीका केली. यावेळी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ प्रमुख रुपेश राऊळ, तालुकाप्रमुख मायकल डिसोझा, तातो राऊळ
विनोद काजरेकर रमेश गावकर सचिन मुळीक संदीप पांढरे प्रशांत बुगडे सिताराम राऊळ शामसुंदर मालवणकर महेश मालवणकर निळू गावडे सुरेश राऊळ भगवान पाटकर महादेव घोगळे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
श्री तेली बोलताना पुढे म्हणाले सावंतवाडी मतदारसंघाचा केसरकरांनी विकास केला तर त्यांना साड्या वाटप विविध आमिषे का दाखवावी लागतात तुम्ही विकास केला तर जनता तुमच्या पाठीशी का नाही असे अनेक प्रश्न त्यांनी यावेळी केले तर या मतदारसंघात शिवसेनेच्या तिकिटावर दोन वेळा निवडून येऊन मतदार संघातील मतदारांचा अपमान करून शिवसेनेची गद्दारी करणाऱ्या केसरकरांना हीच जागा दाखविण्याची वेळ आहे त्यामुळे तुम्ही सर्वांनी मला या ठिकाणी एकदा जनतेची सेवा करण्याची संधी द्या तुम्हाला अपेक्षित विकास नक्कीचच करेन आजची निवडणूक ही भविष्य घडविणारी आहे त्यामुळे मतदारांनी जागरूकपणे ठाकरे शिवसेनेला मतदान करावे आज या मतदारसंघात शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत आहे त्यामुळे सर्वांनी मशाल या चिन्हा समोर बटन दाबून मतदान करावे येत्या एक वर्षात माझ्या हातून या ठिकाणी महत्त्वाचे प्रश्न मार्गी लागताना दिसतील असाही विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
