⚡सावंतवाडी ता.१०-: दत्त माऊली आश्रम, माहुल गांव चेंबूर, मुंबई येथे धर्मभास्कर सद्गुरू संचारेश्वर महाराज यांच्या जीवन चरित्राची आणि कार्याची ओळख करून देणाऱ्या दीपावली विशेषांकाचे प्रकाशन ८ नोव्हेंबर २०२४ रोजी झाले. सद्गुरु पाचलेगांवकर तथा श्री संचारेश्वर महाराजांचे परमभक्त असणारे सिंधुदुर्ग मसुरेचे सुपुत्र व मुंबईस्थित दिपावली विशेषांकाचे मुंबई स्थित मुख्य संपादक श्रीकांत सावंत यांच्या परिश्रमातून हा दीपावली विशेषांक प्रकाशित झाला आहे. ह्या अंकाचे प्रकाशन श्री दत्तानंद स्वामी महाराज यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी श्री दत्तानंद स्वामी महाराज यांनी श्री सद्गुरू संचारेश्वर महाराज जीवन चरित्र व कार्याची माहिती दिली. दत्त माऊली आश्रम तर्फे श्री संचारेश्वर दीपावली विशेषांकाचे मुख्य संपादक श्री श्रीकांत सावंत यांचा शाल व श्रीफळ देऊन विशेष सत्कार करण्यात आला.
श्री संचारेश्वर दीपावली विशेषांक प्रकाशन कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे जेष्ठ उद्योजक श्री दादासाहेब परुळकर ह्यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमात श्री गणेश पहीनकर हिंगोली, श्री संतोष काटोले, अरुण भोसले यांचा सत्कार करण्यात आला.
ह्या कार्यक्रमाला श्री दत्त माऊली आश्रम माहुलगाव मधील पृथ्वीराज चव्हाण, श्रीपाद धुरी, कामतीकर, कमलाकर मालनकर, संजय भंडारे व श्री दत्त माऊली आश्रम मधील समस्त भक्तगण उपस्थित होते.
