नेमळे गावातून 500 पेक्षा जास्त लीड देण्यासाठी प्रयत्न करा…

रुपेश राऊळ यांच ग्रामस्थांना आवाहन: हक्काचा आमदार मिळाल्यास विकास काय असतो ते दाखवून देऊ…

⚡सावंतवाडी ता.१०-: तेली यांना प्रशासनाचा दांडगा अनुभव असलेले उमेदवार आहेत त्यामुळे श्री तेली यांना नेमळे गावातून 500 पेक्षा जास्त लीड देण्यासाठी प्रयत्न करा,असे आवाहन शिवसेना विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ यांनी आज येथे केले.

दरम्यान तेली यांच्या रूपाने या मतदारसंघाला आमदार मिळाल्यास ठाकरे शिवसेनेला नक्कीच बळकटी मिळणार आहे तसेच आपण आपल्या गावासाठी हक्काने विकास कामे आणू शकतो त्यामुळे तेली यांना मतदान करा घराघरात मशाल चिन्ह पोहोचवा तुम्हाला नेमळे गावात लागेल ते सहकार्य करण्यासाठी आम्ही तयार आहोत येत्या एका वर्षात मतदार संघाचा विकास काय असतो ते दाखवून देऊया त्यासाठी एकजुटीने काम करा असे आवाहन त्यांनी केले.

You cannot copy content of this page