नितीन कळंगुटकर:बेकायदेशीर वाळू उत्खननाबाबत कारवाई करून संबंधितांवर गुन्हे दाखल करा..
⚡सावंतवाडी ता.०५-:
महाराष्ट्र व गोवा राज्याला जोडणाऱ्या तेरे खोल नदीवरील सातार्डा पुलाखाली अनधिकृत वाळू उपसा केल्यामुळे पुलाना धोका निर्माण झाला आहे. या पुलावरून दररोज शाळेतील विद्यार्थी शासकीय कर्मचारी गोवा येथे कामात निमित्त जाणारे युवक ये-जा करीत असतात.त्यामुळे येत्या पंधरा दिवसात बेकायदेशीर वाळू उत्खननाबाबत कारवाई करून संबंधितांवर गुन्हे दाखल करावे तसेच पुलाची पाहणी करून संरक्षणात्मक उपायोजना न केल्यास सातार्डा पुलावर रास्ता रोको आंदोलन करून बेमुदत उपोषण करू असा इशारा सामाजिक कार्यकर्ते नितीन कळंगुटकर यांनी प्रशासनाला दिला आहे.
याबाबत त्यांनी निवेदन प्रसिद्धीस दिले आहे त्यात असे म्हटले आहे की
पुलावरुन दररोज शाळेत जाणारी मुले, शासकीय कर्मचारी, वकील, गोवा येथे नोकरीस जाणारे कर्मचारी, मोलमजूरी करणारे मजूर वैगरे ग्रामस्थ वाहनाने तसेच यांचे ये-जा करत असतात.या पुलावरुन सिंधुदुर्ग जिल्हयातील तसेच गोवा राज्यातील विविध वाहने लाखोंच्या संख्येने दररोज प्रवासी वाहतुक करतात. सद्यस्थितीत सदर पुलाखाली रात्रीच्या वेळी ९ ते पहाटे ४ या कालावधीत मोठ्या प्रमाणात बेकायदेशीररीत्या बाळू उत्खनन करुन त्याची यात्रिक बोटीतून राजरोस वाहतुक सुरु आहे. त्यामुळे सदरच्या पुलाच्या पायास धोका निर्माण झालेला असून पुलाच्या खांबांना तड़ा पडलेल्या आहेत. तसेच पुलही खचत चाललेला आहे तसेच सदर पुलांवरुन वाहने जात असताता पुल हलत असतो. त्यामुळे सदरचा पुल कोणत्याही क्षणी कोसळण्याची दाट शक्यता असून त्यावरुन वाहतुक करणान्या वाहनांना तसेच प्रवाशांना, शाळकरी मुलांच्या जीवीतास धोका निर्माण झालेला आहे. बेकायदेशीर वाळू उत्खननामुळे सातार्डा पुलास झालेल्या धोक्याचाबत आम्ही स्थानिक प्रशासनाला वारंवार निदर्शनास आणून देऊनही त्यांचेकडून अद्याप कोणतीही गंभीर दखल घेण्यात आलेली नाही स्थानिक प्रशासनाच्या बेकायदेशीर वाळू उत्खननाबाबत असलेल्या निद्रिस्त धोरणामुळे अनास्थेमुळे हा प्रकार सुरू आहे.त्यामुळे येत्या पंधरा दिवसात सदरच्या बेकायदेशीर वाळू उत्खननाचावत योग्य ती कायदेशीर कारवाई करुन संबंधितांवर गुन्हे दाखल करुन त्याच्या यांत्रिक बोटी जप्त करणेत वाव्यात. तसेच सदर सातार्डा पुलाचे तात्काळ स्ट्रक्चरल ऑडीट करुन त्याचेवर सरक्षणात्मक व सुरक्षात्मक उपाययोजना करावी अन्यथा रस्ता रोको आंदोलन करू असा इशारा त्यांनी दिला आहे. तर त्यांनी प्रशासनाला दिलेल्या निवेदनावर सावंतवाडी संस्थांचे युवराज लखम राजे भोसले सरपंच संदीप प्रभू गोविंद प्रभू तुषार बागकर शंकर मांजरेकर उदय शिरोडकर यांच्यासह पंधराहून अधिक ग्रामस्थांच्या सह्या आहेत.
