जागृत देवस्थान चरणी नतमस्तक: विजयाचा देखील व्यक्त केला विश्वास..
⚡सावंतवाडी ता.०५-: सावंतवाडीतील युवा नेते अपक्ष उमेदवार विशाल परब यांनी आज सावंतवाडीतील जागृत देवस्थान श्री देव पाटेकर व श्री देव उपरलकर यांच्या चरणी नतमस्तक होत प्रचाराचा शुभारंभ केला आहे. यावेळी मोठ्या संख्येने जन समुदाय उपस्थित होता. यावेळी 23 तारखेला आपणच विजयाचा गुलाल उधळणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे.
