मंत्री केसरकर यांची बबन साळगावकरांवर टिका: येणाऱ्या निवडणुकीत यांची जागा मी दाखवून देणार..
⚡सावंतवाडी ता.०५-: माझ्यामुळे अनेक पदे भूषविणारे लोक आज माझ्यावरच टीका करत आहेत. त्यांनी थोडी तरी माणुसकी बाळगली पाहिजे अशी टीका दीपक केसरकर यांनी केली आहे. दरम्यान माझ्यावर कोणीही कितीही टीका केली तरी येणाऱ्या निवडणुकीत या लोकांना मी त्यांची जागा दाखवुन देणार असल्याचा इशारा देखील यावेळी दिला आहे.
