“फेक नेरीटिव्ह” पसरवले तरी सावंतवाडीतील जनता वाईट विचारांना कधीच थारा देत नाही…

मंत्री दिपक केसरकर: मी विकासाचे स्वप्न दाखवत नाही तर सत्यात उतरून दाखवतो, राजन तेलींवर नाव न घेता टिका..

⚡सावंतवाडी ता.०५-: काहीजण गावागावात जाऊन माझ्या बदल फेक नरेटिव्ह जरी पसरवत असले तरी मला त्याचा काही फरक पडणार नाही. परंतु, माझ्याबद्दल फेक नरेटिव्ह पसरवण्यापेक्षा स्वतःच्या कामाविषयी लोकांना सांगा, माझी जनता अशा वाईट विचारांना कधीच थारा देणार नाही अशी जोरदार टीका महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर यांनी राजन तेली यांचे नाव न घेता केली आहे.

यावेळी ते पुढे बोलताना म्हणाले की, मी मतदारसंघात कोट्यवधीचा निधी आणून काम केली आहेत. परंतु, काही लोक माझी बदनामी करत आहेत. परंतु, मी लोकांना स्वप्न दाखवत नाही तर सत्यात उतरून दाखवतो. मी आजपर्यंत त्यांच्याविरोधात संघर्ष केला. त्यामुळे यांच्या विरोधात मला लढा द्यायला वेळ लागणार नाही. असा इशारा देखील नाव न घेता राजन तेली आणि विशाल परब यांना दिला आहे.दरम्यान काही लोक सावंतवाडीतील जनता पैशावर विकत घेऊ शकते आशा भ्रमांत आहेत, परंतु आशा लोकांना जनता बळी पडणार नसून पॉझिटिव्ह विचारला घेऊन जाणाऱ्या लोकांसोबत जनता पाठीशी उभी राहणार असा विश्वास आहे श्री केसरकर यांनी यावेळी व्यक्त केले. आज मी एवढी काम केली असताना सगळ्यांनी मला बिनविरोध निवडून द्यायचं सोडून मला विरोधाला विरोध करत राहायचं काम करत आहेत असा टोला त्यांनी तेली यांना लगावला.

You cannot copy content of this page