⚡सावंतवाडी ता.०५-: शिवसेनेचे जिल्हा समन्वय बाळा गावडे यांनी आपला पदाचा राजीनामा दिला आहे. याबाबतचे पत्र त्यांनी वरिष्ठांना लेखी द्वारे कळवले आहे त्यांच्या या राजीनामामुळे ठाकरे सेनेला ऐन निवडणुकीच्या तोंडावर मोठा धक्का बसला आहे. राजन तेली यांचा शिवसेनेत प्रवेश झाल्यानंतर बाळा गावडे हे कुठेतरी नाराज होते.
मध्यंतरी त्यांनी मी पाडणारच असा स्टेटस देखील लावला होता त्यामुळे बाळा गावडे हे पूर्णपणे नाराज असल्याचं दिसत होते त्यामुळे त्यांनी आता निवडणुकीच्या तोंडावर राजीनामा दिल्याने शिवसेनेला याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
